तेर बातमिदार / विजय कानडे : वटपौर्णिमा निमित्ताने सात जन्मी हाच पती मिळू दे म्हणून सुहासिनी महिलांनी वट पूजन करून देवाला साकडे घातले. नऊवारी साडी, कपाळी सिंदूर कानात झुमके, नाकात नथ, गळ्यात चंद्रहार ,केसात गजरा, हातात बांगड्या व मेहंदी असा मराठमोळा साज घालून वटवृक्षाला दोरा बांधून सात फेरे घेऊन सात जन्मी हाच पती मिळू दे म्हणून वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. जमलेल्या सुहासिनी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून ओटी भरली.
सात जन्मी हाच पती मिळू दे ; तेर येथे सुहासिनींचे वटपौर्णिमेनिमित्त वटपूजन करून देवाला

0Share
Leave a reply