इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो आज जगभरात सर्वत्र योग दिन साजरा करण्यात आला. आज विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिगवण या ठिकाणी योगाभ्यास घेण्यात आला. यासाठी विकास मिना यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले तर योगाभ्यास यशस्वी होण्यासाठी संस्थेचे शिक्षक वेदपाठक सर, बनसोडे सर, पवार सर यांनी परिश्रम घेतले तर मार्गदर्शन आयटीआय चे प्राचार्य मोहिते सर व उपप्राचार्य लिमकर सर यांनी केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन बापूराव थोरात सचिव विजयभैय्या थोरात खजिनदार संतोष थोरात संचालक नंदकिशोर थोरात अजय थोरात उपस्थित होते. योगाभ्यासांमध्ये आयटीआयचे एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
Leave a reply