इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक योग दिनाची औचित्य साधून स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था व महा एन जी ओ फेडरेशन व भाजप सेवा प्रकोष्ठ यांच्या विद्यमाने भिगवन मदनवाडी परिसरात योगाभ्यास आयोजित करण्यात आला होता या योगा अभ्यासात पुणे करीयर अकॅडमी व भैरवनाथ विद्यालय भिगवन येथील तरुणांनी व तरुणींनी सहभाग घेऊन योगाभ्यास केला .
यावेळी योग शिक्षिका कु.प्रतिक्षा वेताळ व कु.निकिता झेंडे यांनी मार्गदर्शन केले आहे. यावेळी पुणे करिअर अकॅडमी चे राजकुमार शेंडगे सर, प्राजक्ता झेंडे, वृषाली काळे, सुकन्या कदम व भैरवनाथ विद्यालयाच्या प्राचार्य भोसले सर पर्यवेक्षिका सौ.सोनवणे मॅडम व सहकारी शिक्षक देवकाते सर, धायगुडे सर,टेंबरे सर व सहशिक्षिका उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेचे सचिव धिरज सोट पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था व महा एन जी ओ फेडरेशन व भाजप सेवा प्रकोष्ठ यांच्या वतीने जागतिक योग दिन साजरा

0Share
Leave a reply